Ad will apear here
Next
‘टाटा प्रोजेक्ट्स’ला आयआयटी संस्थांमध्ये उदंड प्रतिसाद
पाच आयआयटींमधून ५० इंजिनीअर्सची नियुक्ती
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे सीएचआरओ गणेश चंदन आयआयटीमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानामुंबई : टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व सर्वांत प्रशंसाप्राप्त संरचना कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने या वर्षी दिल्ली, मुंबई, मद्रास, कानपूर आणि खरगपूर या भारतातील आघाडीच्या पाच आयआयटी संस्थांमधून ५० इंजिनीअर्सची नियुक्ती केली आहे.

कंपनीच्या फ्लॅगशिप प्रशिक्षणार्थी कार्यक्रमासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत भारतातील सुमारे ६०० इंजिनीअर्सनी यात सहभाग घेतला. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या उद्योगक्षेत्रातील अग्रक्रमामुळे सध्या आघाडीच्या आयआयटींमध्ये चाललेल्या कॅम्पस् प्लेसमेंट सीझनमध्ये कंपनीला पहिल्या व दुसऱ्या दिवशीचे स्लॉट्स देण्यात आले.

नव्याने पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना रचनाबद्ध प्रशिक्षण, आंतर-कार्यात्मक प्रकल्प आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या यांच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापन व व्यवसाय नेतृत्वासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. यामध्ये जगातील सर्वोत्तम संस्थांमधून प्रशिक्षण प्राप्त करण्याच्या संधींचाही समावेश आहे.

म्हणाले, ‘आमच्या भविष्यकाळावर लक्ष केंद्रित करणाऱ्या धोरणांसाठी आम्हाला सृजनशील, कामावर प्रेम करणाऱ्या व महत्त्वाकांक्षी अशा तरुण प्रतिभेची गरज आहे. आमच्या वाढत्या व्यवसायाच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी, तसेच वाढलेली जटीलता हाताळण्यासाठी आम्ही सातत्याने उच्च दर्जेच्या प्रतिभेला आकर्षित करून घेत आहोत. आमच्या प्रतिभा संपादन धोरणाला पूरक ठरावे म्हणून आम्ही देशातील अव्वल दर्जाच्या संस्थांशी अध्ययन व विकास उपक्रमांसाठी सहयोग केला आहे. भारतातील एक आघाडीची संरचना कंपनी म्हणून आमचा भर केवळ प्रतिभेचा संचय वाढवण्यावर नाही, तर त्याचा दर्जा व उत्पादनक्षमता सातत्याने सुधारत राहण्यावरही आहे. यामुळे वाढही योग्य रितीने होईल आणि सर्व संबंधितांना लाभ होऊन भारताच्या प्रगतीचा वेग वाढण्यातही मदत होईल.’    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZTTCH
Similar Posts
७० लाखांचे पॅकेज नाकारून इलेक्ट्रिक वाहनांची कंपनी सुरू करणारा जिगरबाज अली उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असते. लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर सहसा कोणी नाकारत नाही; पण दिल्लीच्या मोहम्मद आमिर अली या जिगरबाज तरुणाने थोड्याथोडक्या नाही, तर ७० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी नाकारली आणि भारतात राहून देशासाठी काही तरी करण्याच्या इच्छेने इलेक्ट्रिक वाहने बनवणारी स्वतःची कंपनी सुरू केली
‘शिशिर रामेश्वरम नॅशनल टॅलेंट हंट’ शिष्यवृत्तीकरिता नोंदणी सुरू मुंबई : भारतीय संरक्षण दलांच्या परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या मुंबईतील सेंचुरियन डिफेन्स अकादमी या सेंचुरियन एज्युकेशन प्रा. लि.च्या संरक्षण विभागाने वर्ष २०२०साठी ‘शिशिर रामेश्वरम नॅशनल टॅलेंट हंट’ची (एसआरएनटीएच) नोंदणी सुरू केली आहे. संरक्षण दलात अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक
डॉ. सायरस पूनावाला यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ‘आयसीएमआर’ पुरस्कार प्रदान पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language